34 c Kolhapur
कोल्हापूर

कोल्हापुरातील पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

M

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलाच्या शिरपेचात आता आणखी एक मनाचा तुरा रोवला गेलाय. कोल्हापूर ॲन्टी करप्शन ब्युरो मधील सहायक पोलीस उप निरीक्षक अमरसिंह भोसले आणि मोटर वाहन विभाग मधील सहाय्यक फौजदार बबन शिंदे यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झालंय. पोलीस दलामधील केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी त्याना राष्ट्रपती पदक जाहीर झालंय. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला पदक प्रदान करून त्यांना गौरवण्यात येणार आहे. पोलीस दला मधील सर्वोच्च अशा या पुरस्काराने जरी मला सन्मानित करण्यात येत असले तरी माझ्या आजवरच्या जिवन प्रवासात व ३३ वर्षाच्या सेवा कालावधी मध्ये आपण केलेले बहुमोल मार्गदर्शन व अमुल्य असे सहकार्य यामुळेच मला हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला असे मी मानतो. असे मत अमरसिंह भोसले यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Read Previous

जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज करणं महागात, गुन्हा दाखल

Read Next

कोल्हापुरात पोलिसांनी रोखला बालविवाह