34 c Kolhapur
कोल्हापूर

कोल्हापुरात पोलिसांनी रोखला बालविवाह

M

कोल्हापूर : कोल्हापुरात लग्न सुरू असतानाच झाली पोलिसांची एंट्री. ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित राहिल्यामुळे पोलीस कारवाई करण्यासाठी आले असावेत अस अनेकांना वाटले. पण पोलिसांनी कारवाई केली वेगळीच. नवर्याटचे वय २० आणि नवरीचे वय १७ होते त्यामुळे बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी आणि पोलिसांनी हा बालविवाह रोखल्यावर सर्व वऱ्हाडी आणि नातेवाईकांना हा प्रकार समजला. यावेळी पोलिसांनी वरासह आठ नातेवाईकांवर गुन्हा नोंदवला आहे. जवाहरनगर येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयात बाल विवाह होणार असल्याची माहिती बाल विकास अधिकारी आणि पोलिसांना कळाली. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी मंगल कार्यालयात तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी वधू आणि वराचा वयाचा पुरावा मागितला. त्यानुसार राहूल माळी याचे वय २० होते तर वधूचे वय १७ होते. त्यानुसार, पोलिसांनी वर राहूल माळी, वर पिता संभाजी माळी, वर माता शारदा माळी, मनोहर साळोखे, छाया साळोखे, सुनीता जगताप, मंगला जगताप, सुनील जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Read Previous

कोल्हापुरातील पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Read Next

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे 26 जानेवारीपासून खुली