कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे 26 जानेवारीपासून नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या निर्बंधांनुसार ऐतिहासिक किल्लेा आणि पर्यटनस्थळांवर नागरिकांना 10 जानेवारीपासून बंदी होती. दरम्यान, पर्यटनस्थळांवर कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. गर्दी होणार नाही, याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला घ्यावी लागणार आहे.