वेब टीम : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची घोषणा झालीय. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झालाय. यामध्ये ४ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ७ ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेसाठी ४० ‘पोलीस पदक’ तर महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांनाही ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झालेत.