34 c Kolhapur
महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्राने 7 भावी डॉक्टर गमावले

M

वर्धा : वर्ध्याच्या सेलसुरामध्ये चारचाकी गाडीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय. हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात गाडीतील सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.

Read Previous

महाराष्ट्रातील ५१ पोलिसांना पदकांची घोषणा

Read Next

.....जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन