वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म

06122021_133238.jpeg

गाझियाबाद: शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आज हिंदू धर्म स्वीकारला आहे. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्म मिळवून दिला हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर रिझवी म्हणाले, मला आमच्याच लोकांनी इस्लाममधून बहिष्कृत केले, त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. सनातन धर्म हा जगातील पहिला धर्म असून त्यात चांगुलपणा आणि मानवता आढळते. आम्ही इस्लामला धर्म मानत नाही. मोहम्मद पैगंबरांनी निर्माण केलेला इस्लाम हा धर्म वाचून आणि त्यांचा दहशतवादी चेहरा पाहिल्यानंतर तो धर्म नाही हे मला समजले आहे.