पन्हाळगडच्या बुरजाखालील तट बंदीतील दगडी शिळा निसटू लागल्या

05122021_175439.PNG

कोल्हापूर : पन्हाळगडच्या मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजा बुरजाखालील तट बंदीतील दगडी शिळा निसटू लागल्या आहेत. त्यामुळे पायथ्याशी वसलेल्या मंगळावरपेठ गावास मोठा धोका निर्माण झालाय. जुना प्रवाशी कर नाका ते चार दरवाजा बुरुज दरम्यान तट बंदीतील दगडी शिळा गेले दोन दिवसा पासून निसटून मंगळवार पेठे च्या दिशेने येवू लागल्या आहेत. तट बंदी ते बुरुज दरम्यान पोकळी निर्माण झाली असून कधी ही तटबंदीसह बुरुज मंगळवार पेठेत कोसळून माळीण सारखी दुर्घटना शक्यता व्यक्त होत आहे. २३ जुलै रोजी अतिवृष्टीने पन्हाळगडचा मुख्य रस्ता खचून मंगळवारपेठेत पाण्याचा पूर आणि दगडे आणि माती येथील मोठे नुकसान झाले. त्यातुन सावरत असताना परत तट बंदीतून दगडी शिळा आणि माती निसटू लागल्याने मंगळवार पेठे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे येथील लोकांना जिव मुठीत घेऊन जगावे लागते आहे. कोणत्या ही क्षणी काही ही होईल याची शाश्वती उरलेली नाही. तसेच या बुरजा शेजारी शिवा काशीद यांचा पुतळा असून त्यास पण धोका निर्माण झाला आहे.