गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला संभाजी ब्रिगेडनं काळं फासलं

05122021_161947.jpg

नाशिक : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला काळं फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संभाजी ब्रिगेडनं गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला काळं फासलं. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत हे काळं फासण्यात आलं. नाशिकमध्ये साहित्य संमेलनादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलाय. दुपारच्या सुमारास परिसंवाद होणार होता. मुख्य गेटजवळ गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्यावर काळं फासण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या दोन लोकांनी पत्रकंही भिरकावली. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध असं या पत्रकात लिहिण्यात आलं होतं. पोलिसांनी काळं फासणाऱ्य़ा संभाजी ब्रिगेडच्या दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर गिरीश कुबेर परिसंवादासाठी व्यासपिठावर उपस्थित होते. तसंच यानंतर साहित्य संमेलनातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.