निवृत्तीनंतरही चाहत्यांना सचिनची भुरळ

05122021_153507.jpeg

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीला अनेक वर्षे लोटली, पण तो आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या मुंबई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी याचे उदाहरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या एका चेंडूवर शुबमन गिलने चौकार ठोकला. शुबमनची साथ देण्यासाठी कप्तान विराट कोहलीही मैदानात होता. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील ३७ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर गिलने जोरदार प्रहार केला. चेंडू जलद वेगाने सीमारेषेकडे गेला. काही वेळातच मैदानातील उपस्थित प्रेक्षकांनी सचिन-सचिन…च्या घोषणा दिल्या. मास्टर ब्लास्टरने २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.