भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी वर्णी

27102021_160145.jpg

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यापूर्वीही भारतीय वंशाचे हरजीत सज्जन हे संरक्षण मंत्री होते. अनिता आनंद यांचा भर लष्करातील प्रमुख सुधारणांवर असेल असं म्हटलं जात आहे.संरक्षण खाते हरजीत सज्जन यांच्याकडे होते त्यावेळी त्यांच्यावर लष्करातील व्यभिचाराची प्रकरणे हाताळण्यात अपयश आल्याचे आरोप करण्यात आले होते.दरम्यान, अनिता यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्यापुढे लष्करातील या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.नोवा स्कोटिया येथे १९६७ मध्ये अनिता यांचा जन्म झाला. त्यांचे आई- वडील भारतीय असून दोघेही वैद्यकीय क्षेत्रात आहेत. अनिता एस व्ही आनंद हे तामिळनाडूचे असून आई सरोज या पंजाबच्या आहेत.