राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर

27102021_144105.jpg

राज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे. दरम्यान, मुंबईतील शाळांना दिवाळीची 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण निरीक्षकांनी शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. मात्र, उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आल्याने थोडीसी नाराजी असली तर अनेकांनी आनंद व्यक्त केला.