.... तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन - नवाब मलिक

27102021_142328.jpeg

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. "नवाब मलिकांनी यावेळेस मी दिलेले पुरावे खोटे आढळले तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि खरे आढळल्यास वानखेडेंना राजीनामा द्यावा लागेल" आव्हान दिले आहे.जर एका समीरला असा फर्जीवाडा करुन नोकरी मिळत असेल तर 15 कोटी मुस्लिमांना मागासवर्गीय म्हणून अशी नोकरी मिळेल का?, असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी विचारला. मी दाखवलेला जातीचा आणि जन्माचा दाखला जर खोटा असेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा पुनरुच्चार मलिक यांनी करताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याची चौकशी करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली.