सोन्याच्या दरात मोठी घसरण!

26102021_155626.jpg

सणासुदीचा काळ सुरू आहे आणि काही दिवसांतच दिवाळी सुरू होणार आहे. याकाळात सोन्याचांदीच्या किंमतींत चढउतार सुरू आहे. अशावेळी तुम्ही सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे. आज सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 8059 रुपयांनी कमी आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.12 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात 0.29 टक्क्यांची घसरण झाली आहे. 8059 रुपयांनी स्वस्त आहे सोनं 2020 बद्दल बोलायचे झाल्यास, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.MCX वर आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत सोने 48,141 रुपये प्रति तोळावर आहे. म्हणजेच आज सोने सुमारे 8059 रुपयांनी स्वस्त आहे. आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.12 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 48,141 रुपये प्रति तोळावर आहेत.