सावनीला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिके चा पुरस्कार प्रदान

25102021_174016.jpg

दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आज सावनी रविंद्रला बार्डो चित्रपटातील रान पेटलं या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे तिचे मराठी सिनेसृष्टीत तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे. सावनीची मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती अशा विविध भाषेतील गाणी प्रसिद्ध आहेत.आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र राष्ट्रीय पुरस्काराविषयी सांगते, आज मला या नामांकीत राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरवण्यात आले. त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नाही आहे. मी हा पुरस्कार माझ्या दोन महिन्यांच्या मुलीला समर्पित करते. ती माझ्यासाठी लकी चार्म आहे. अर्थातच माझ्या सर्व गुरूजनांचे आशीर्वाद, माझ्या आई-वडीलांचे कष्ट आणि कुटूंबीय यांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात यश संपादन करू शकले.तिने बार्डो चित्रपटातील संगितकार रोहन - रोहन यांचे आभार देखील मानलं आहेत. तसेच आजवर मी ज्यापद्धतीने गाणी गायली त्याहीपेक्षा अजून जास्त मेहनत करून प्रेक्षकांना आवडतील अशी उत्तमोत्तम गाणी गाण्याचा मी कायम प्रयत्न करेन. या पुरस्काराच्या रूपात कौतुकाची थाप मला मिळाली असं वाटतं. अशीच भारतीय अभिजात संगीताची सेवा माझ्याकडून घडो.अशी सावनी म्हणाली आहे.