राज ठाकरेंना कोरोनाची लागण

23102021_174248.jpg

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महापालिकेने देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज ठाकरेंच्या आईलाही कोरोनाची लागण आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. राज ठाकरेंना ताप असून सध्या दोघेही घरीच क्वारंटाईन आहेत.राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आगामी महापालीका निवडणुकींनिमित्त मनसेचा उद्या आणि परवा पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा काल पुढे ढकलण्याच आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला होता.