साहिब बीवी और गुलाम फेम अभिनेत्री मीनू मुमताज काळाच्या पडद्याआड

23102021_162617.jpg

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री मीनू मुमताज यांचे आज २३ ऑक्टोबरला निधन झाले आहे. त्यांनी कॅनडामध्ये अखेरचा श्वास घेतला. मुमताज यांच्या भावाने त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या भावाचे नाव अनवर अली असे आहे. मीनू मुमताज यांच्या भावाने बहिणीच्या निधनाची बातमी देत सिनेइंडस्ट्री, मीडिया आणि त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार देखील मानले आहेत. मीनू मुमताज या बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदवीर महमूद अली यांच्या बहिण आहेत.मुमताज यांनी अनेक हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केल्या आहेत. १९५० ते १९६० च्या दशकात त्यांनी बॉलिवूडवर राज्य केले आहे. मुमताज फक्त एक अभिनेत्री नव्हत्या तर त्या प्रसिद्ध डान्सर देखील होत्या. मीनू यांनी त्यांच्या करियरची सुरूवात डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर पन्नासच्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून काम केले.