कोल्हापुरात पर्यटन जनजागृती मोटार सायकल रॅली

27092021_182938.JPG

जागतिक पर्यटन दिन व सप्ताह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी कोल्हापुरात साजरा केला जात आहे. या निमित्ताने आज कोल्हापूर शहरात, कोल्हापूर-पावणखिंड-आंबा-कोल्हापर आणि कोल्हापूर ते गगणबावडा या मार्गावर पर्यटन जनजागृतीसाठी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. दसरा चौकात या मोटार सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी झेंडा दाखवून केला. पर्यटन जनजागृतीसाठी ट्रॅव्हल एजंटअसोसिएशन,कोल्हापूरच्यावतीने काढण्यात आलेली मोटार सायकल रॅली दसरा चौक येथून खानविलकर पेट्रोल पंप- जिल्हाधिकारी कार्यालय-धैर्य प्रसाद चौक-ताराराणी पुतळा चौक-सयाजी हॉटेल-उड्डाण पूल- कमला कॉलेज- बस रुट-माऊली पुतळा-राजारामपुरी मेन रोड-जनता बाजार चौक-बागल चौक- उमा टॉकीज चौक, टायटन चौक -पुन्हा दसरा चौक या मार्गावर होणार आहे.डी. जे. रेसर ग्रुपच्यावतीने पर्यटन जनजागृती काढण्यात आलेली मोटार सायकल रॅली कोल्हापूर- पावणखिंड-आंबा-कोल्हापूर या मार्गावरुन तर रायडर्स ऑफ कावासाकी यांच्यावतीनेही काढण्यात आलेली मोटार सायकल रॅली कोल्हापूर- गगणबावडा-कोल्हापूर या मार्गावर होणार आहे.