पोलीस हवालदार मेतके यांचे शिये पंचक्रोशीत कौतुक

24092021_190356.JPG

शिये: श्रीराम नगर शिये येथील रहिवाशी विलास बाळासो पाटील हे त्यांचे कळंबा येथील मामाकडे कामानिमित्त 20 सप्टेंबर रोजी दुपारी गेले होते ते सायंकाळी घरी परत आल्यानंतर त्यांना पैशाचे पाकीट पुढील पडल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी सदर पाकिटाची शोधाशोध सुरु केली परंतु त्यांना मिळाले नाही. मात्र सदरचे पाकीट शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मेतके यांना सापडले होते त्यांनी सदरचे पाकीट साहेब पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या उपस्थितीत विलास पाटील यांना सुपूर्द केले. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार शशिकांत बाबुराव मेतके यांना 20 सप्टेंबर रोजी कळंबा येथून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे येत असताना दुपारी रोडवर एक पाकीट पडलेले दिसले त्यांनी सदर चे पाकीट ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यामध्ये कोणत्या प्रकारची ओळखपत्र नसल्याने सदर चे पाकिट शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये पडताळणीसाठी घेऊन आले असता त्यामध्ये एकूण 33 हजार 505 रुपये इतकी रक्कम होती. सदरची रक्कम शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश खांडवे यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सोशल मीडियाद्वारे माहिती प्रसारित करून पाकिटाची ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडिया वरील पोस्ट द्वारे सदरची माहिती विलास पाटील यांना मिळाली असता त्यांनी त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. ओळख पटल्यानंतर सदरची रक्कम विलास पाटील यांच्याकडे देण्यात आली. विलास पाटील यांनी पोलीस दलाचे आणि पोलीस हवालदार मेतके यांचे विशेष आभार मानले. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेतके यांच्या कार्याला सलाम केला. ज्यामुळे पंचक्रोशीत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शशिकांत बाबुराव मेतके यांचे प्रामाणिकपणा बाबत कौतुक होत आहे.