मी येतोय : किरीट सोमय्या...पुन्हा येणार कोल्हापूरात

22092021_184332.jpg

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोल्हापूर दौरा जाहीर केला आहे. येत्या मंगळवारी किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या आणि संघर्ष होण्याची शक्यता आहे.सोमवारी कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास सुरू केल्यानंतर मुंबईपासून कराडपर्यंत पोलीस माजी खासदार किरीट सोमय्या यांची कोल्हापूरला जाऊ नये, यासाठी मनधरणी करत होते. त्यानंतर कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कराड रेल्वेस्टेशनवर कोल्हापूर जिल्हा प्रवेश मनाईचा आदेश किरीट सोमय्या यांच्या हाती दिला आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कराडच्या विश्रामगृहात आणण्यात आले. मुंबईपासून सुरू झालेला हा आठ तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा कराडला समाप्ता झाला सोमय्यांना परत धाडण्यावरून राज्य सरकारमधील गृहकलह समोर आला होता. त्यामुळे पुढील दौऱ्यात काय होणार ? याची आता उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.