चंदन तस्करी करणारे तिघे ताब्यात

22092021_184108.jpeg

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काळूद्रे येथे बुधवारी पहाटेच्या दरम्यान चंदन तस्करी करणाऱ्या तीन चोरट्यांना प्रादेशिक वन विभाग पणुंब्रे वारूनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. प्रादेशिक वन विभागाने त्यांच्याकडील चार दुचाकी तसेच चंदनाची तीन लाकडे काळुंद्रे ग्रामपंचायत कार्यालयात ठेवली आहेत. तर चार दुचाकी वहाने काळुंद्रे येथील मारुती मंदीरात ठेवण्यात आली आहेत.याप्रकरणी तीन संशयीत आरोपी प्रादेशीक वन विभागाच्या ताब्यात आहेत. तर दोन आरोपी फरार असल्याचे समजते. त्यांचा तपास सुरू आहे. दरम्यान काळुंद्रे गावामध्ये दोन दिवसापुर्वी दोन घरफोडया झाल्या असल्याचे समजते. त्यातील एका घरातुन 25 हजाराची रोख रक्कम चोरटयांनी लंपास केली आहे. तर दुसऱ्या घरातील साहीत्याची नासधुस केली असल्याचे ग्रामस्थातुन बोलले जात आहे. दरम्यान चोरीची माहिती समजताच कोकरुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी भेट दिली.