भाडूगळेवाडीतील पोलीस पाटीलाचा महिलेवर अत्याचार

22092021_182708.JPG

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आरलापैकी भाडूगळेवाडी येथील पोलीस पाटील सुनील कदम यांनी गावातीलच एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. याबाबत कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील कदम पोलीस पाटील असल्यामुळे तो पदाचा गैरफायदा घेत गावातील महिलेला वारंवार त्रास देत होता. मोबाईलवर अस्लील चित्रे टाकून त्रास देत होता. सदर महिलेचा पति मुंबई येथे असून तर सासू सासरे वयोवृद्ध आहेत. घरी कोण नसल्याचे कारण पुढे करून इच्छेविरुद्ध वारंवार तो गैरवर्तन करत होता. असह्य झाल्यामुळे महिलेने कोकरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अधिक तपास फौजदार संजय पाटील करत आहेत.