जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा धुरळा नोव्हेंबर मध्ये

22092021_182114.JPG

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२१- २०२६ पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीमध्ये हरकती आणि दावे मागवण्यात आले होते. यामध्ये एकूण ११८ हरकती आल्या असून २२ सप्टेंबर पर्यंत सुधारित मतदार यादी निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेकडे सादर केला आहे. यामध्ये एकूण ७६४७ संस्थांच्या मतदारांची यादी आहे. जिल्हा बॅंकेकडून आवश्यकतेनुसार बदल करून २७ सप्टेंबर अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून नोव्हेंबर मध्ये निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना संसर्गामुळे पुढे स्थगित करण्यात आलेली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्हा बँकेकडून विभागीय प्रारूप मतदार यादी सहनिबंधकाकडे पाठवण्यात आली होती. यामध्ये ३ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीत हरकती मागवण्यात आले होते यामध्ये एकूण ११८ तक्रारी आल्या असून यापैकी २३ दुबार ठराव तर ९५ हरकती आल्या होत्या. यामध्ये विविध कार्यकारी गटातून दोन संस्था तर एक संस्थेची नोंदणी रद्द झाल्याने ३ संस्था कमी करण्यात आल्या आहेत तर ७६४७ इतकी मतदार यादी जिल्हा बँकेकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिली. दरम्यान जिल्हा बँकेकडे पाठवण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करून २७ सप्टेंबर ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादी प्रसिद्ध झालेल्या १० दिवसानानंतर आणि २० दिवसांच्या आत उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरु होणार असून नोव्हेंबर मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.