शियेचे उपसरपंच शिवाजी गाडवे यांचे पद धोक्यात ?

22092021_181347.jpg

शिये : करवीर तालुक्यातील शिये गावचे उपसरपंच यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असून त्यांना अपात्र ठरवण्यात यावे अशी तक्रार जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे दाखल झाले असून त्यांचे पद धोक्यात आले आहे. याबाबत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करवीरचे गटविकास अधिकारी यांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शिये येथील गट क्रमांक २८३ मध्ये उपसरपंच शिवाजी गाडवे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात अली आहे .