अबब ! सांगलीत आढळली तब्बल 12 फुटी मगर

29072021_134727.JPG

सांगलीत ही पूराच्या पाण्यातून अनेक ठिकाणी मगरी आलेल्या पाहायला मिळल्या.अशीच एक घटना पूरबाधित सांगलीवाडी परिसरात घडली आहे .सांगलीवाडीमधील धरण रोडवर बुधवारी सकाळी मगर दिसली. काही तरुणांनी या मगरीला हुसकावून लावलं. त्यानंतर ही मगर लिंगायत स्मशानभूमीतील झाडांमध्ये लपून बसली. याची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मगरीला पकडलं., या मगरीची लांबी तब्बल 12 फूट असून, ही एक पूर्ण वाढ झालेली मगर आहे. मगरीला पकडल्यानंतर वनविभागाने त्या मगरीला नंतर नैसर्गिक अधिवसात पाठवले आहे. दरम्यान, नागरी वस्तीमध्ये एवठी मोठी मगर आढळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.