वाढदिवसानिमित्त 1 रुपयात 1लिटर पेट्रोल

22072021_173457.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 वाढदिवस आज साजरा होत आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आणि जाहिराती न करण्याचे सूचवले होते.त्यातून पुण्यातील धानोरी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केवळ 1 रुपयात एक लिटर पेट्रोल देण्यात येत आहे. त्यामुळे, येथील ठिकाणावर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेकांनी गर्दी केली आहे.देशात पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी गाठली आहे. त्यातच, मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107 रुपयांच्यापुढे गेला आहे. त्यामुळेच, 1 रुपयातं पेट्रोल घेण्यासाठी येथे दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज 1 रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकप्रकारे केंद्र सरकारचा निषेधचं नोंदवला आहे.