पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

22072021_165448.jpg

कोल्हापुरातील पंचगंगा नदीने यावर्षी पहिल्यांदाच इशारा पातळी ओलांडली आहे.त्यामुळे जिल्हयात एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या असून यापैकी एक टीम शिरोळ तर एक टीम कोल्हापूर शहरात आहे.जिल्ह्यातील पूर स्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर आज एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. 25-25 स्वयंसेवकांच्या या दोन तुकड्यांपैकी एक तुकडी शिरोळ तालुक्यासाठी तर दुसरी तुकडी करवीर आणि कोल्हापूर शहरासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर एक पथक प्रयाग चिखली याठिकाणी रवाना होत आहे. कोल्हापूरची पूरस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे एनडीआरएफने त्यांच्या नियोजनानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या आहेत.