गुरुपौर्णिमेला नृसिंहवाडीत भाविकांना प्रवेश बंद

22072021_165002.jpg

नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी २३ व २४ जुलै अखेर भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.दरवर्षी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होते.गुरुचरणांचे दर्शन, गुरुपूजन, ध्यानधारणा, अभिषेक, पूजा, आदीसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, आदी राज्यांतून भाविक येत असतात. मात्र, गतवर्षापासून कोरोना महामारीमुळे मंदिरे बंद असल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तभक्त व भाविकांना येता आले.नाही. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवासास मुभा असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीचा संसर्ग व प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने शुक्रवार व शनिवार अखेर गुरुपौर्णिमेनिमित्त पोलीस प्रशासन यांच्यामार्फत गावात भाविकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आल्याचे उपसरपंच रमेश मोरे यांनी सांगितले.