राज कुंद्रा प्रकरणी अभिनेता उमेश कामत भडकला

22072021_145536.JPG

पॉर्न व्हिडीओ रॅकेटप्रकरणी राज कुंद्रा व आणखी एक आरोपी उमेश कामत याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांच्या अटकेनंतर काही वृत्तवाहिन्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवत बातम्या दिल्या. या प्रकरणाशी आपला काहीही संबंघ नसताना प्रसारमाध्यमांनी आपला फोटो वापरल्याने उमेश कामत भडकला असून त्याने या माध्यांमांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.उमेश कामत हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. तर राज कुंद्रा प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव देखील उमेश कामत आहे. नावातील साधर्म्यामुळे काही प्रसारमाध्यमांनी अभिनेता उमेश कामतचा फोटो लावत बातम्या दिल्या आहेत. याबाबत उमेशने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कारवाईचा इशारा दिला आहे.