साताऱ्याची संगममाहुली स्मशानभूमी पाण्याखाली

22072021_144833.JPG

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी गुरुवारी पाण्याखाली गेली. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांवर साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात.पण ही स्मशानभूमीचं पाण्याखाली गेल्यामुळे .आता कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न पालिकेपुढे उभा ठाकला आहे.जिल्हा प्रशासनाकडून या कामाची जबाबदारी सातारा पालिकेला देण्यात आली आहे. पालिकेने या कामासाठी १९ कर्मचाऱ्यांचे पथक नेमले असून, प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.