कोल्हापूर ,सांगलीत पुन्हा लॉकडाऊन ?

21072021_180249.jpg

राज्यातील काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच कोल्हापूरचा दौरा करत कोविड स्थितीचा आढावा घेतला होता. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा दौरा करुन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय टीमने या दोन्ही जिल्ह्यांतील कोरोनाची वाढत्या संख्येवरुन चिंता व्यक्त केली आहे. तसेच या दोन्ही जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा सल्लाही दिला आहे. तर राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय टीमच्या अहवालाची वाट पाहत आहेत.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही कोरोना बाधितांची संख्या ही अधिक असल्याचं दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर , सांगली जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता केंद्रीय टीमने नुकताच या दोन्ही जिल्ह्यांचा दौरा केला. हा दौरा केल्यानंतर केंद्रीय टीमने राज्यसरकारला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात 10 असे जिल्हे आहेत जेथे पॉझिटिव्हिटी दर हा खूपच जास्त आहे. केंद्रीय टीमने या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. या जिल्ह्यांत कोरोना टेस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आणि लसीकरण वाढवण्यासा सल्लाही केंद्रीय टीमने दिला आहे.आम्ही सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत आहोत. कोल्हापूर आणि सांगली ने चिंता वाढवल्याने पुन्हा हे जिल्हे लॉक डाऊन होण्याची चिन्हे आहेत.