कोल्हापुरात बकरी ईद साध्या पद्धतीने

21072021_165903.JPG

त्यागाचे प्रतिक म्हणून साजरी केली जाणारी बकरी ईद संपूर्ण देशाभरामध्ये साजरी झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समस्त मुस्लिम बांधवांनी यंदाचीही बकरी ईद घरच्या घरी सध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. कोल्हापुरातही मुस्लिम बांधवानी पाचच लोकांच्या उपस्थितीत नमाज आणि दुवा पठण केले.येथील ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथील ईदगाह मैदानावर प्रत्येक वर्षी हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत सामुदायिक नमाज पठण केले जाते. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद गेली दोन वर्षे सामुदायिक नमाज पठण झालेले नाही. यंदाही ५ लोकांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वाजता नमाज पठण करण्यात आले. यावेळी मौलाना मुबीन बागवान यांनी बकरी ईदची नमाज पठण कौन खुतबा वाचन केले. त्यानंतर झालेल्या दुवा म्हणजेच प्रार्थनेदरम्यान संपूर्ण जगांवर ओढवलेल्या कोरोना संसर्ग दूर व्हावे तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.