अबब...सोनवडेत साडेसहा फूटाचा अजगर

21072021_164409.JPG

शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील नाईकवाडा परिसरातील आनंदा नाईक यांच्या घराजवळ भला मोठा अजगर दिसला. त्यानी गावातीलच सर्पमित्र संग्राम कुंभार याना याची माहिती दिली. त्यानंतर संग्राम कुंभार, विलास नांगरे, अमोल कांबळे यानी नाईकवाडा गाठला. तेथे त्यांना भला मोठा अजगर दिसला. त्यानी अजगराला शिताफिने पकडले. या अजगराची लांबी साडे सहा फूट आणि वजन तब्बल १२ किलो होते. यानंतर त्यांनी हा अजगर चांदोली अभयारण्य परिसरात सोडला. त्यामुळे अजगराला जीवदान मिळाले. दरम्यान सर्पमित्र संग्राम कुंभार यानी दोन वर्षात तब्बल शंभरावर सापांना जीवदान दिले आहे.