कळंबा तलाव भरून वाहतोय

20072021_175316.JPG

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर मध्ये मुसळधार सुरु असल्याने पंचगंगा पाणी पातळीत वचढ़ झाली असून १८ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापुरच्या सौंदर्यात भर घालणारा तलाव म्हणजे कळंबा होय. कोल्हापुरात मुसळधार सुरु असल्याने कळंबा तलाव भरून वाहत आहे. कळंबा तलावाचे हे सौंदर्य पाहण्यासाठी लहानापासून मोठ्या पर्यंत सर्व जन जमले होते. याठिकाणी त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही लहानापासून मोठ्यांपर्यन्त सर्वानी त्याठिकाणी सेल्फी काढली. वाहणारा कलंबा तलाव, पडणारा मुसळधार पाऊस आणि बाजूलाच गरमागरम कणीस यामुळे येथे येणाऱ्या जाणार्यांना कळंबा तलाव साद घालत आहे.