प्रति पंढरपूर नंदवाळ येथे साध्या पद्धतीने आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला

20072021_174617.JPG

चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी ,विठ्ठल विठ्ठल श्री हरी. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या चरणी महाभिषेक सोहळा पडला. या सोहळ्यासाठी पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील करवीरच्या तहसीलदार शितल मुळे भामरे आणि करवीर पंचायत समितीचे शाखा अभियंता उमेश कोळी तसेच इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण उपस्थित होत्या यावेळी देवस्थान समिती व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच व वारकरी संप्रदाय यांच्यातून काकड आरती करण्यात आली प्रत्येक वर्षी ५ लाखाहून अधिक भक्त याठिकाणी येत असतात मात्र कोरोना संसर्गामुळे याहीवर्षी यात्रा रद्द करण्यात आल्याने सध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदवाळ याठिकाणी दरवर्षी आशाडी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातून आणि राज्यातून ५ लाखाहून अधिक भाविक याठिकाणी या सोहळ्यासाठी येत असतात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे गत वर्षी आणि याहीवर्षी होणारी हि यात्रा रद्द करण्यात आली. याहीवर्षी सध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. करवीर च्या तहसीलदार शितल मुळे भामरे आणि पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. दरवर्षी गर्दीने फुललेला हा परिसर मात्र सुना सुना होता.