शेरनीचा दमदार टीझर रिलीज

31052021_175047.jpg

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील विद्याच्या नव्या आणि आव्हानात्मक लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझरदेखील रिलीज करण्यात आला आहे. ज्यात विद्या बालन एका घनदाट अशा जंगलात दिसत आहे. जंगल कितीही घनदाट असलं तरी वाघीण आपला मार्ग शोधतेच या आवाजाने या टिझरची सुरुवात होते. या चित्रपटाचा ट्रेलर २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना लिहिले, काहीही फरक पडत नाही, ती योग्य गोष्टी करेल. २ जूनला ट्रेलर रिलीज होणार आहे. तर शेरनी जून, २०२१ ला प्राइमवर भेटीला येणार आहे.