बालपणीचा टारझन काळाच्या पडद्याआड

31052021_124508.jpg

सुप्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा टारझन अभिनेतेचा अमेरिकेतील विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातात जो लारा यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. लारा यांनी ग्वेन शम्बलिन यांच्याशी 2018 मध्येच विवाह केला होता. जो लारा 58 वर्षांचे होते.विमानोड्डाण प्रशासनाने सांगितले की, स्मिर्ना रदरफोर्ड काउंटी विमानतळावरून शनिवारी दुपारी 11 वाजता सेसना सी501 विमानाने उड्डाण केले होते. यानंतर काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झाले. ते पर्सी प्रीस्ट झीलमध्ये कोसळले. हे विमान पाम बीच या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणार होते. प्रत्यक्षदर्शींनी हे विमान तलावाच्या पाण्यात पडताना पाहिले. जो लारा यांनी 1989 मध्ये टेलिव्हिजन फिल्म टारझन इन मॅनहॅटन यात टारझनची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी टारझन: द इपिक अॅडव्हेंचर्स या टीव्ही सिरिअलमध्ये काम केले होते.