लॉकडाऊनमधे कृषी दुकानं दिवसभर सुरु राहतील - कृषी मंत्री दादा भुसे

31052021_122958.jpg

राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी खरीप हंगाम लक्षात घेता राज्यातील कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व आस्थापनं दिवसभर सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.परभणीत कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृषी क्षेत्राच्या लातूर विभागीय आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.शेतकऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत कुठेही अडचण होऊ नये याचा विचार करुन आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या व्यवस्थापनांची,ट्रॅक्टर दुरुस्तीची आणि ड्रिपची आस्थापनं चालू ठेवण्यास अनुमती देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावर्षी मान्सून वेळेवर असून पेरणी आणि इतर शेतीविषयक कामांसाठी या सुविधा कोविडचे सर्व नियम पाळून सुरु ठेवण्याबाबत खबरदारी घेण्याचेही यावेळी बोलताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.