केरळमध्ये मान्सून दोन दिवस उशीरा होणार दाखल -हवामान विभाग

30052021_165623.jpg

दरवर्षीप्रमाणे केरळमध्ये मान्सूनचं 1 जूनला होणारं आगमन यंदा लांबणीवर गेलं आहे . आता दोन दिवस उशीरा केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह 1 जूनपासून जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसात केरळात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही पुढील 4-5 दिवस मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मान्सूनच्या वाटचालीत कोणतीही गती नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.