खोटं ओळखपत्र बनवून सेलिब्रिटी झाली फ्रंटलाईन वर्कर

30052021_162448.png

एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुठवडा जाणवत असून ठाणेकर नागरिकांना लस मिळले मुश्कील झाले असताना दुसरीकडे नोंदणी न करता नियम डावलून एका महिला सेलिब्रिटीने लस घेतल्याचे उघड झाले आहे. ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे असलेल्या रुग्णालयात ही लस देण्यात आली असून या अभिनेत्रीची कोविड सेंटरची फ्रंट लाईन वर्कर म्हणून खोटे ओळखपत्र बनवण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या सेलिब्रिटीला ही लस कोणी दिली आणि कशी दिली? या संशोधनाचा विषय असला तरी नियमबाह्य लस दिल्याने पालिका प्रशासन चांगलेच गोत्यात येणार आहे.