मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन

30052021_161131.jpg

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कथित बॉम्बचा तपास सुरु आहे. साधारणतः तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचं त्या फोनवरुन सांगण्यात आलं होतं, अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचं पथक याठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे.