मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साधणार जनतेशी संवाद

30052021_160712.jpg

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे. लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील का? . मुख्यमंत्री लॉकडाऊन बाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे, मात्र ज्या भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे शिथिलता दिली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.