बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर

30052021_105645.jpg

पद्मावत, मणिकर्णिका या सिनेमांविरोधात करणी सेनेने दंड थोपटले होते. आता बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे. या सिनेमाचे नाव आहे, पृथ्वीराज. अक्षय कुमारच्या या आगामी सिनेमाच्या नावाला करणी सेनेने विरोध दर्शवत हे टायटल बदलण्याची मागणी केली आहे. करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाचे टायटल बदलण्याची मागणी केलीय. पृथ्वीराज चौहान एक महान योद्धा होते. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. पद्मावत, मणिकर्णिका या सिनेमांविरोधात करणी सेनेने दंड थोपटले होते. आता बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे. या सिनेमाचे नाव आहे,पृथ्वीराज. अक्षय कुमारच्या या आगामी सिनेमाच्या नावाला करणी सेनेने विरोध दर्शवत हे टायटल बदलण्याची मागणी केली आहे. करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाचे टायटल बदलण्याची मागणी केलीय. पृथ्वीराज चौहान एक महान योद्धा होते. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मग सिनेमाचे नाव फक्त पृथ्वीराज का? सिनेमाच्या नावातही पृथ्वीराज चौहान यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा, असे सुरजीत सिंह यांनी म्हटले आहे.