नवाज शरीफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल!

05102020_182810.jpg

पाकिस्तानी सैन्याची पोलखोल करणाऱ्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा लाहौरमध्ये खटला दाखल झाला आहे. शरीफ यांना लंडनमध्ये भडखाऊ भाषण देऊन पाकिस्तानच्या प्रतिष्ठित संस्थांविरोधात कट रचल्याचा आरोप एफआयआरमध्ये केलाय. पाकिस्तानला गुंडागर्दी करणारे राष्ट्र घोषित करणे, असा शरीफ यांच्या भाषणांचा उद्देश होता. देश आणि देशातील संस्थांविरोधात लोकांना भडकवण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पाकिस्तानी सैन्याला कमकूवत करण्यासाठी शरीफ भारताला मदत करताहेत. पाकिस्तानी सैन्यावर राजनैतिक हस्तक्षेपाचा आरोप करुन एक धोकादायक खेळ खेळत आहेत, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलीय. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा सध्या लष्कर आणि सरकारमध्ये सर्वाधिक चांगले संबंध आहेत, असा दावाही इम्रान खाननी केला आहे