"गोष्ट एका पैठणीची" सिनेमाचं सुव्रतने केलं डबिंग, शेअर केला क्रेझी अनुभव

05102020_182234.jpeg

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेकांना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. पण अभिनेता सुव्रत जोशीनं एक क्रेझी अनुभव घेतला. गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचे त्याचे राहिलेले डबिंग त्याने चक्क लंडनमध्ये पूर्ण केले आहे. गंमत म्हणजे या डबिंगवेळी दिग्दर्शक शंतनू रोडे "झूम"द्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे, तर लंडनमधील डबिंग स्टुडिओतील तंत्रज्ञ बांगलादेश आणि पोलंडचे होते. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.