सीपीआरची बदनामी करणार्यां ची माझ्याशी गाठ : राजेश क्षीरसागर

05102020_180449.jpeg

सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, पण नॉन कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना हॉस्पीटल उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. तेव्हा नॉन कोविड रुग्णांसाठी सीपीआरमध्ये स्वतंत्र सुविधा उपलब्ध करा, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. तसेच सीपीआरची बदनामी करणारे एक टोळके कार्यरत आहे, त्या टोळक्यांचा शोध घेतला जात आहे. या टोळक्याने हे प्रकार थांबवावे, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, असा अशाराही क्षीरसागर यांनी दिला. नॉन कोविड रुग्णांचे होणारे हाल थांबविण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत क्षीरसागर यांनी सीपीआरमध्ये अधिकार्यांनची बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्स डॉ. आर.सी. केम्पीपाटील, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह अन्य पदाधिकारी होते. क्षीरसागर म्हणाले, सीपीआर हे पूर्णपणे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविले जाते आहे. पण त्या ठिकाणी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली जात आहे. सीपीआरमधील प्रसुती विभाग बंद आहे. गोरगरीब कुटूंबातील महिलांवर घरीच प्रसुती होण्याची वेळ येत आहे. हे प्रकार थांबण्यासाठी सीपीआरध्ये नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करावे, ग्रामीण भागातील सरकारी रुग्णांलयांमध्येही तीच परिस्थिती आहे. तेव्हा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांसाठी कक्ष सुरु करावे, सीपीआर हे अनेकांचा आधारपड आहे, पण या रुग्णालयाला बदनाम करणारी टोळी सीपीआर आवारात कार्यरत आहे, या टोळक्याने हा प्रकार थांबवावा, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला.