तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते ;सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने केले ट्विट

01082020_125554.jpg

सुशांत सिंह राजूपतच्या आत्महत्या प्रकरणाला सध्या एक नवे वळण आले आहे. त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल झाला. यामध्ये रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी शुक्रवारी रियाचा व्हिडीओ शेअर करत सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर आता सुशांतच्या बहिणीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते असे म्हटले असून ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याच्या कोणी गॉडफादर नव्हता आणि आताही नाही. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही अशी मी विनंती करते या आशयाची पोस्ट तिने केली आहे.