सुशांत सिंग राजपूत डिसेंबर २०१९ पासून काही संशयास्पद औषधे घेत होता - सामी अहमद

01082020_120838.jpg

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दीड महिना उलटलेला असतानाही अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.दरम्यान आता सुशांतच्या जीम ट्रेनरने धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांत डिसेंबरमध्ये अशी काही औषध घेत होता जी त्याने आधी कधीही घेतली नव्हती अशी माहिती ट्रेनरने दिली आहे.सुशांतचा ट्रेनर सामी अहमद याने एका मीडिया हाऊसला सांगितले की, सुशांत सिंग राजपूत डिसेंबर २०१९ पासून काही संशयास्पद औषधे घेत होता. याचा त्याच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होत होता.पुढे त्याने सांगितले की, सुशांतने अशी औषधे आधी कधीही घेतली नव्हती. या औषधांचे सेवन केल्यानंतर त्याचे हातपाय थरथराचे. बऱ्याचदा तो अस्वस्थ राहू लागला होता. त्याने एक दोन महिन्यांसाठी या औषधांचा कोर्स करत असल्याचे सांगितले होते. मी त्याला यासाठी मनाई केल्यानंतर तो म्हणाला होता की, एकदा कोर्स सुरू केल्यानंतर असा मध्येच सोडू शकत नाही.डिप्रेशनसोबतच त्याला डेंग्यू झाला होता. नोव्हेंबरमध्ये सुशांतने मला सांगितले होते की, पॅरीसवरून परतल्यानंतर त्याला डेंग्यू झाला आहे. त्यांचे डॉक्टरांकडून काउसिलिंगही सुरू होते. सुशांतचे वागणे खूप बदलले होते. साधा व्हायरल ताप आला तरी तो कधी औषधे घेत नव्हता. परंतु या औषधांमुळे त्याला नीट वर्कआऊटदेखील करता येत नव्हते.