आमच्यासाठी 5 ऑगस्ट हा काळा दिवस आहे - मेहबूबा मुफ्ती

01082020_115601.jpg

आमच्यासाठी 5 ऑगस्ट हा काळा दिवस आहे, असे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याठिकाणी बोलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी इल्तिजा मुफ्तीने असे विधान केले आहे.केंद्र सरकारने शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ केली आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकारने महबूबा मुफ्ती यांना नजरकैद केले आहे. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यापासून मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत आहेत.