नामदास महाराजांवरील गुन्हे रद्द करा, शिंपी समाजाचे निवेदन

31072020_204504.jpeg

पंढरपूर : श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज ह. भ. प. नामदास महाराज यांच्यावर पंढरपूर येथे दाखल केलेले गुन्हे तात्काळ रद्द करावेत. याबाबत पंढरपूर नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री गणेश लक्ष्मण उंडाळे यांनी माननीय प्रांताधिकारी पंढरपूर यांना लेखी निवेदन दिले. यावेळेस समाजाचे उपाध्यक्ष श्री संजय जवंजाळ, विश्वस्त श्री महेश गानमोटे व श्री संत नामदेव शिंपी युवक संघटना पंढरपूर अध्यक्ष शैलेश धट हे उपस्थित होते.