तासगावातील पेडमध्ये बोकडाची किंमत तब्बल दीड लाख!

ईदच्या पार्शवभूमीवर तासगाव तालुक्यातील पेड या गावातील सुरेश शेंडगे यांच्या बोकडाला सुमारे दीड लाखाची मागणी होत आहे. या बोकडाच्या माथ्यावर चंद्र असे चिन्ह आहे. सर्वसाधरणपने बकरिद् ईदसाठी लागणाऱ्या बोकडाची किंमत 10 हजारपासून ते 50 हजार रुपये इतकी असते. पण चंद्रकोर असलेल्या या बोकडास दिड लाखाची मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे. सदर बोकडाचे वजन जवळपास 70 ते 80 किलोच्या आसपास आहे. या बोकडाला रोज दोन किलो शेंग पेंड, दोन किलो गहू व हारबरा डाळ. असे खाद्य लागते.